Advertisement

वालावलकर कॉलेज शुल्कवाढ : पालकांची मंत्रालयावर धडक


वालावलकर कॉलेज शुल्कवाढ : पालकांची मंत्रालयावर धडक
SHARES

रत्नागिरीतील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने मनमानीपणे केलेल्या शुल्कवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी दुपारी मंत्रालयावर धडक दिली. प्रहार विद्यार्थी संघटना आणि शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंच या संघटनांच्या नेतृत्वाखाली पालकांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उत्स्फूर्तपणे धरणे आंदोलन केले. याआधीही वालावलकर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुंबईत आंदोलन केले होते.


वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशाचे शुल्क 2016 साली 4.09 लाख एवढे होते. मात्र 2017 मध्ये हेच शुल्क मनमानीपणे वाढवून 7.25 लाख एवढे करण्यात आले आहे. हे शुल्क वाढवून देण्याचे काम शिक्षण शुल्क नियंत्रण समितीने परस्पर केले. सरसकट 86 टक्के शुल्क वाढवून समितीने विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक लूट चालवली आहे. शुल्कवाढ करताना विद्यार्थी, पालकांच्या तक्रारी देखील शिक्षण शुल्क नियंत्रण समितीचे अध्यक्ष एम. एन. गिलानी यांनी ऐकून घेतल्या नाही. या मनमानीचा जाब विचारण्यासाठी धरणे आंदोलन केल्याचे यावेळी प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे वाढीव शुल्क रद्द करावे, शासकीय कोट्यातून खासगी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शासकीय महाविद्यालयात आकारण्यात येणारे शुल्क घ्यावे, आदी मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा