Advertisement

मलबार हिलमधील पार्किंगची समस्या मार्गी लागणार

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली

मलबार हिलमधील पार्किंगची समस्या मार्गी लागणार
प्रतिकात्मक फोटो
SHARES

मलबार हिल परिसरात महत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा नेहमीच सुरू असते. अशा स्थितीत रहिवाशांची वाहने उभी करता येत नाहीत. त्यामुळे ध्वनिप्रदूषणही होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणात आता मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला आहे.

तसेच दिपक केसरकर यांनी आदेश दिले आहेत की, रहिवाशांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी पालिका आणि ट्राफिक पोलिस अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर एक प्लॅन बनवावा. जेणेकरून रहिवाशांच्या समस्येचे निराकरण होईल. 

परिवहन विभागाने या समस्येवर उपाययोजना करून रहिवाशांना दिलासा द्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, महापालिकेच्या डि वॉर्डातील अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. फेरीवाले, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे व सांडपाणी, अन्नपुरवठा आदी समस्या तातडीने सोडविण्यात येतील. रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डि प्रभागातील नागरिकांशी ‘सरकार आपके द्वार’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी स्थानिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

दीपक केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. त्यांच्यासाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची योजना असून त्यांना नेण्यासाठी स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.



हेही वाचा

ठाणेकरांनो लक्ष द्या! शुक्रवारी पाणीपुरवठा नाही

गुडन्यूज! मेट्रो 7 मार्गावरील दोन फूटब्रिज जनतेसाठी खुले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा