Advertisement

या गाड्यांना वालीच नाही


या गाड्यांना वालीच नाही
SHARES

ढाकेनगर - पश्चिमेला भरडावाडी, ढाकेनगर, जास्मीन सोसायटीसमोर अनाधिकृत गाडया रस्त्यालगत बेवारस अवस्थेत पडलेल्या आहेत. या वाहनांना वारसदारच नाहीये. आणि स्थानिक नागरिकांनी या वाहनांची अक्षरश: कचराकुंडी केली आहे. याच जेपी रोडवर वनवेमुळे भरडावाडी मार्गे येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनांना आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. याबाबत वारंवार नगरसेवक मोसीन हैदर यांच्याकडे तक्रारी करूनही ते लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया रहिवासी इकबाल हालाई यांनी दिली. मात्र विभागाचे अधिकारी पराग म्हसूरकर यांनी यावर लवकरच कारवाई केली जाईल असं आश्वासन मुंबई लाईव्हशी बोलताना दिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा