Advertisement

ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' भागांमध्ये 6 मे रोजी 12 तास पाणीकपात

ठाणे महानगरपालिकेने (TMC) 6 मे रोजी काही भागात 12 तास पाणीकपात जाहीर केली आहे.

ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' भागांमध्ये 6 मे रोजी 12 तास पाणीकपात
SHARES

ठाणे महानगरपालिकेने (TMC) 6 मे रोजी काही भागात 12 तास पाणीकपात जाहीर केली आहे. 

"शहरातील विविध ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी शनिवारी (6 मे) सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही," टीएमसीने सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील उथळसर वॉर्डांतर्गत जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी के-विला नाला येथील पुलाच्या कामामुळे बंद पडली आहे.

बाधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू असल्याने, शनिवार, 6 मे रोजी सदर जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन हाती घेतल्याने सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.", असे टीएमसीने म्बाहटले आहे.

श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी 1, राबोडी 2, पंचगंगा, आकाशगंगा, के-विला परिसर, पोलीस लाइन, टेंभीनाका, सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, उथळसर वॉर्डातील जलकुंभ अंतर्गत धोबी लेन या भागांमध्ये पाणीकपात करण्यात आली आहे.  

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे टीएमसीने म्हटले आहे. नागरी संस्थेने शहरातील रहिवाशांनाही पाणी साठवून त्याचा काटकसरीने वापर करण्यास सांगितले आहे.



हेही वाचा

भातसा धरणात केवळ ४२% पाणीसाठा शिल्लक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा