...आणि प्रवाशाला रेल्वेत विसरलेले लाखो रुपये सापडले!

wadala
...आणि प्रवाशाला रेल्वेत विसरलेले लाखो रुपये सापडले!
...आणि प्रवाशाला रेल्वेत विसरलेले लाखो रुपये सापडले!
See all
मुंबई  -  

वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोकलमध्ये विसरलेली लाखो रुपयांनी भरलेली बॅग एका प्रवाशाला परत मिळाली आहे. ती बॅग अंधेरी स्थानकात उतरलेल्या प्रवासी रेखा महेश गाला यांची आहे. त्या बॅगेत 2 लाख 79 हजार रुपये इतकी रोख रक्कम होती.

रेखा महेश गाला या आपल्या वैयक्तिक कामानिमित्त रविवारी हार्बर मार्गावरून मानखुर्द ते अंधेरी लोकलने प्रवास करत असताना त्या गाडीतच बॅग विसरुन अंधेरी स्थानकात उतरुन निघून गेल्या. काही वेळानंतर त्यांना आपण बॅग लोकलमध्ये विसरलो असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा अंधेरी स्थानकात धाव घेतली. मात्र सदरील लोकल अंधेरी स्थानकातून सीएसटीच्या दिशेकडे निघाली होती. त्यामुळे त्यांनी रेल्वेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता सदरची लोकल वडाळा स्थानकात फलाट क्रमांक तीनवर येताच वडाळा लोहमार्ग पोलीस शिपाई मुकुंद कोकणे यांनी महिला डब्याची तपासणी केली असता बॅग आढळून आली. सदर बॅग ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली असता त्यात 2 लाख 79 हजार रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर प्रवासी गाला यांच्याशी संपर्क साधून त्यांना बॅग सापडली असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण शहानिशा करुन गाला यांना वडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या हस्ते बॅग सुपूर्द करण्यात आली. रेल्वे हेल्पलाईन क्रमांक आणि लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॅग सापडली त्यामुळे गाला यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.