Advertisement

मध्य रेल्वेच्या सेक्टरवाईज लोकल प्रस्तावामुळे प्रवाशांमध्ये संताप

या प्रस्तावामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या कामकाजात बदल होऊ शकतो असा दावा सादरीकरणात केला जात असला तरी, लीक झालेल्या प्रस्तावावर तीव्र विरोध सुरू झाला आहे.

मध्य रेल्वेच्या सेक्टरवाईज लोकल प्रस्तावामुळे प्रवाशांमध्ये संताप
SHARES

मेट्रो ट्रेन ऑपरेशन्सप्रमाणेच सेक्टर निहाय कॉरिडॉरमध्ये विभागून उपनगरीय रेल्वे व्यवस्थेचे आमूलाग्र बदल करण्याच्या मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई विभागाच्या वादग्रस्त प्रस्तावावर प्रवाशांकडून आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

गेल्या वर्षी रेल्वेमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावात सध्याच्या चालू नेटवर्कला आठ कार्यरत कॉरिडॉरमध्ये विभागून गर्दीच्या वेळेत उपनगरीय रेल्वेची वारंवारता दर तीन मिनिटाला एक लोकल करण्याचे उद्दिष्ट आहे.

यामध्ये सीएसएमटी-ठाणे (धीमी), ठाणे-कल्याण (धीमी), कल्याण-कसारा (धीमी), सीएसएमटी-कल्याण (जलद), सीएसएमटी-पनवेल (धीमी), बेलापूर-उरण (धीमी) आणि ठाणे-नेरुळ/वाशी (धीमी) असे इतर मार्ग असतील.

या प्रस्तावामुळे मुंबईच्या लोकल ट्रेनच्या कामकाजात बदल होऊ शकतो असा दावा सादरीकरणात केला जात असला तरी, लीक झालेल्या प्रस्तावावर तीव्र विरोध सुरू झाला आहे.

"हा प्रस्ताव पूर्णपणे मूर्खपणाचा आहे. ज्या व्यक्तीने तो तयार केला आहे त्याला मुंबईबद्दल काहीच माहिती नाही आणि त्याने कधीही मुंबई उपनगरीय नेटवर्कचा वापर केला नाही," असे मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन म्हणाले.

नाव न सांगण्याच्या अटीवर मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "ही योजना कागदावर चांगली दिसत असेल, परंतु प्रत्यक्षात ती पूर्णपणे अव्यवहार्य आहे. ठाणे आणि कल्याण सारख्या वर्दळीच्या जंक्शनवर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात ट्रान्सशिपमेंट करावे लागेल."



हेही वाचा

शिवाजी महाराजांचा 'अनादर' केल्याबद्दल काँग्रेसची फडणवीसांवर टीका

आरे ते कफ परेड किती असेल तिकिट? जाणून घ्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा