Advertisement

हार्बर मार्गावर १२ एसी लोकल फेऱ्यांकडं प्रवाशांची पाठ

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनी एसी लोकलला नाकारलं आहे. हार्बर मार्गावर सुरू झालेल्या १२ एसी लोकल फेऱ्यांकडं प्रवाशांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे.

हार्बर मार्गावर १२ एसी लोकल फेऱ्यांकडं प्रवाशांची पाठ
SHARES

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता हार्बर मार्गावरील प्रवाशांनी एसी लोकलला नाकारलं आहे. हार्बर मार्गावर सुरू झालेल्या १२ एसी लोकलकडं प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. शिवाय, साध्या लोकल रद्द करून त्या वेळेत महागडी एसी लोकल चालवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रवासी संघटनेने दिला आहे.

एसी लोकलचे तिकीट आणि पास प्रथम दर्जाच्या तिकीट दरापेक्षा महाग आहे. आधीच पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचे दर कडाडले आहेत. अशात महागड्या एसी लोकलचा प्रवास परवडण्यासारखा नाही. इतका महाग पास घेतल्यानंतरही २ लोकल फेऱ्यांमधील अंतर तास-२ तासांचं असल्यानं प्रवाशांसाठी फार पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळं एसी गाडी एवढीच जमेची बाजू या लोकलमध्ये आहे. त्यामुळं प्रवाशांचा या लोकलला कमी प्रतिसाद आहे.

मध्य रेल्वेला महागडे तिकीट आकारूनच एसी लोकल चालवायची असेल, तर ती नवीन वेळेवर अतिरिक्त लोकल म्हणून चालवावी. त्यासाठी सामान्य लोकल रद्द करू नये. साध्या लोकलमध्ये मालडबा, दिव्यांग अशी स्वतंत्र व्यवस्था असते. एसी लोकलमध्ये अशी व्यवस्था नाही. यामुळं सर्वसामान्यांच्या दृष्टीनं एसी लोकल ही केवळ डोकेदुखी आहे.

या पार्श्वभूमीवर, साध्या लोकल रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे आंदोलन उभे राहिले, तर त्याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा हार्बरवरील प्रवाशांनी दिला.

हार्बर मार्गावरील पनवेल-अंधेरी लोकलचा विस्तार आता गोरेगावपर्यंत झाला आहे. बुधवारी प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर श्रीफळ अर्पण करत या लोकलचे स्वागत केले. पनवेल-अंधेरी गाडीचा विस्तार गोरेगावपर्यंत झाल्यानं प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. अंधेरीला उतरून पूल चढून प्लॅटफॉर्म बदलून लोकलची वाट पाहण्याच्या आणि गर्दी असल्यास दुसरी लोकल येईपर्यंत वाट पाहण्याच्या कटकटीतून आता प्रवाशांची सुटका होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा