Advertisement

सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना निष्काळजी


सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना निष्काळजी
SHARES

सामाजिक अंतरासोबतच मास्कचा वापर सक्तीचा असतानाही कोरोनाविषयक नियम सर्रास धाब्यावर बसविण्यात येत असून रिक्षा, टॅक्सी, बसमधून प्रवास करणारे प्रवासी मास्कविना प्रवास करताना दिसत आहेत. कोरोनाविषयी मनात असलेली भीती काहीशी दूर झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना पायदळी तुडविल्या जात आहेत.

सायन, दादर, माटुंगा, परळ परिसरांत पाहणी केली असता ५ टॅक्सीचालकांमागे केवळ एकच चालक मास्कचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. बहुतांशी चालक मास्कचा अयोग्य पद्धतीने वापर करीत असल्याचे आढळले. केवळ चालकच नाही तर प्रवाशांमध्येही तेवढीच बेफिकिरी दिसून आली.

धारावी, वांद्रे, खार, वाकोला, सांताक्रूझ परिसरांतही हेच चित्र पाहायला मिळाले. बेस्टचे वाहक मास्कचा वापर करताना दिसले. काही ठिकाणी चालक मास्कविना होते, परंतु ते क्वचितच. प्रवासी मात्र कोणतीही भीती न बाळगता विनामुखपट्टी प्रवास करताना दिसले.

धारावी आणि वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यानच्या टी जंक्शन सिग्नलवर पालिकेच्या क्लिन-अप मार्शल कारवाईसाठी तैनात आहेत; परंतु मास्कविना प्रवास करणारे प्रवासी मात्र या कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक देतात.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा