Advertisement

मुंबई विमानतळावर कोविड चाचणी निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी अन्न, इंटरनेटची सुविधा

सीएसएमआयएनं सप्टेंबरपासून आरटी-पीसीआर चाचण्या सुरू केल्या आहेत.

मुंबई विमानतळावर कोविड चाचणी निकालाची वाट पाहणाऱ्यांसाठी अन्न, इंटरनेटची सुविधा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे की, जे विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी सुविधेचा लाभ घेत आहेत अशा प्रवाशांना वाय-फायद्वारे मोफत इंटरनेट सेवा देण्यात येईल आणि त्यांना भोजनही दिलं जाईल.

नमूना गोळा झाल्यानंतर चाचणी निकाल लागण्यास ८ तास लागू शकतात. विमानतळावर प्रवाशांकडून प्रत्येक चाचणीसाठी ३ हजार ९०० रुपये शुल्क आकारले जाते. नव्यानं समाविष्ट केलेल्या सुविधांपैकी ताजी गरम आणि थंड पेयांची उपलब्धता (विनंती केल्यावर) आणि प्रतीक्षा करण्यासाठी अमर्यादित इंटरनेट प्रवेशासह खास मेनूमधून खाद्यपदार्थ निवडण्याची परवानगी आहे.

सीएसएमआयएनं सप्टेंबरपासून आरटी-पीसीआर चाचण्या सुरू केल्या आहेत. विमानतळाच्या निवेदनात म्हटलं आहे की, ८००० लोकांनी या सुविधेचा फायदा घेतला आहे. त्यामध्ये १ हजार ०९० महिलांचा तर ६ हजार ९१० पुरुषांचा समावेश होता. यापैकी केवळ १०० जणांनी सकारात्मक चाचणी केली आहे, असं निवेदनात पुढे म्हटलं आहे.

शहराच्या विमानतळाच्या इन्ट्री आणि एक्जीट गेटवर आता चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, विमानतळावरील आरटी-पीसीआर चाचणी मुंबईतील सर्वात वेगवान चाचणी आहे, ज्यामुळे धोकादायक लोकांसाठी हवाई प्रवास अधिक सुरक्षित आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा