Advertisement

हिंदमाता पुलाखाली रुग्णांना राहण्यास बंदी

मुंबईत राहाण्याची योग्य सोय नसल्यानं या परिसरातील पदपथ तसंच हिंदमाता पुलाखाली ते मुक्काम करतात.

हिंदमाता पुलाखाली रुग्णांना राहण्यास बंदी
SHARES

मुंबईच्या परळ परिसरात के.इ.एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय आहेत. या रुग्णांलयात दररोज अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. मात्र मुंबईत राहाण्याची सोय नसल्यानं तसंच, आरामाची गरज असल्यानं अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे परळ येथील हिंदमाता पुलाखाली राहतात. मात्र आता या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना राहाता येणार नाही. या पुलाखाली महानगर पालिका कुंपण घालणार असून प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

मुंबईत राहाण्याची योग्य सोय नसल्यानं या परिसरातील पदपथ तसंच हिंदमाता पुलाखाली ते मुक्काम करतात. मात्र, त्यामुळं या परिसरात अस्वच्छता होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जाते. महापालिकेनं यापूर्वी काही वेळा या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसह धर्मशाळांमध्ये राहाण्याची सोय केली आहे. मात्र, तरीही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुलाखाली तसंच परिसरातील पदपथावर राहातात.

हा परीसर रुग्णालयापासून जवळ असल्यानं रोजच्या प्रवासाची दगदग रुग्णांना करावी लागत नाही. तसंच प्रवासासाठी खर्चही होत नाही, असं असलं तरी यामुळं अस्वच्छता होत असलेल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहे. अनेक वेळा वादाचेही प्रसंग निर्माण झाले आहेत. त्यामुळं महापालिकेनं आता या पुलाखालील परिसराला कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाण पुलाखाली महापालिका उद्यान तयार करत आहे. उड्डाण पुलाच्या खालील काही भागात कुंपण घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हिंदमाता उड्डाण पुलाखालीही कुंपण घालण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. या सर्व कामांसाठी महानगर पालिका ५ कोटी ६६ लाख २८ हजार रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव या महिन्याच्या महासभेच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा