Advertisement

पेंग्विनसाठी फार शुल्क नसेल - उद्धव ठाकरे


पेंग्विनसाठी फार शुल्क नसेल - उद्धव ठाकरे
SHARES

मुंबई - पेंग्विन आपल्याला मुंबईत पाहायला मिळणार ही जुनी बातमी. पण हे पेंग्विन पाहण्यासाठी फार पदरमोडही करावी लागणार नाहीये... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हे स्पष्ट केलंय. मुंबई लाइव्हनं काही दिवसांपूर्वी याबाबतचं वृत्त दिलं होतं. त्यानंतर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमीत कमी शुल्कात पेंग्विनदर्शन होईल असं स्पष्ट केलंय. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पेंग्विन मोफत दाखवण्यात यावेत, असंही म्हटलंय. पेंग्विनसंदर्भात काहीही घाईगडबडीनं चाललेलं नाही. सगळ्या गोष्टी वेळापत्रकानुसारच सुरू आहेत. ठरल्या वेळेनुसार काम पूर्ण झालं, तर मला श्रेय घेण्याची आवश्यकता नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईकरांचा खिसा कापू नका - नितेश राणे
मुंबईकरांनी कराच्या रुपानं दिलेल्या पैशांतूनच महापालिकेनं पेंग्विन आणले आहेत. मग ते पाहण्यासाठी पुन्हा मुंबईकरांचा खिसा का कापला जावा, असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केलाय. तसंच, जोपर्यंत पेंग्विनच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या संकल्पनेचं उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा