Advertisement

पालघर, सफाळे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको

पश्चिम रेल्वेच्या पालघर व सफाळे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केले आहे.

पालघर, सफाळे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको
SHARES

पश्चिम रेल्वेच्या पालघर व सफाळे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केले आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे नवे वेळापत्रक ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. मात्र, ३ डिसेंबर पासून अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्यानं पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको आंदोलन केले.

कोरोना काळात मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वेनं नवीन वेळापत्रकात रद्द करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्यानं या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींना दिलं होतं.

त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याविषयी कोणतीही ठोस कृती न झाल्यानं रेल्वे प्रवाशांनी बुधवार पहाटे पालघर रेल्वे स्थानकात तसंच सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको केले. त्यामुळं मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस तसंच डहाणूकडे जाणारी लोकल रोखून ठेवण्यात आली होती.

पालघर रेल्वे स्टेशन मास्टरनं प्रवाशांच्या मागण्यांचं निवेदन घेऊन ते मुंबई सेंट्रलला पाठवण्याचं आश्वासन रेल्वे आंदोलकांना दिलं, पाठवपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितल्यानंतर अडवलेली लोकल मुंबईच्या दिशेनं सोडण्यात आली, तर काही प्रवासी मुंबई सेंट्रल कार्यालयात जाऊन ह्या विरोधात निवेदन देणार असल्याचं सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा