Advertisement

मनोरुग्णांनाही मिळणार विमा कवच!

याअाधी अारोग्य विम्यामध्ये फक्त शारीरिक अाजारांचा समावेश केला जात होता. अाता मात्र मानसिक अाजाराचाही अारोग्य विम्यामध्ये समावेश होणार अाहे.

मनोरुग्णांनाही मिळणार विमा कवच!
SHARES

मानसिक अाजार झालेल्या लोकांनाही अाता विमा संरक्षण मिळणार अाहे. मानसिक अाजाराचा समावेश अारोग्य विम्यामध्ये करण्याचा अादेश विमा नियंत्रक अाणि विकास प्राधिकरण (इर्डा) ने देशातील सर्व विमा कंपन्यांना दिला अाहे.


इर्डाचे निर्देश

याअाधी अारोग्य विम्यामध्ये फक्त शारीरिक अाजारांचा समावेश केला जात होता. अाता मात्र मानसिक अाजाराचाही अारोग्य विम्यामध्ये समावेश होणार अाहे. इर्डाने विमा कंपन्यांना परिपत्रक काढून यासंबंधीचा अादेश दिला अाहे. मानसिक अाजार झालेल्या व्यक्तींसाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर अारोग्य विम्याची तरतूद करावी, असं या परिपत्रकात इर्डानं म्हटलं अाहे. मानसिक अाजार हा शारीरिक अाजारांप्रमाणेच मानण्यात यावा, असा अादेश इर्डाने देशातील विमा कंपन्यांना दिला अाहे.  इर्डाच्या अादेशामुळे लवकरच मानसिक अाजार झालेल्या रुग्णांना विमा कवच मिळणार अाहे. 


पूर्वग्रह दूर व्हावेत

देशात २९ मे २०१८ पासून मानसिक आरोग्य अधिनियम २०१७ लागू करण्यात अाला अाहे. अधिनियमानुसार, मानसिक आरोग्य सेवांमध्ये व्यक्तीची मानसिक तपासणी, उपचार आणि पुनर्वसन यांचा समावेश करण्यात अाला अाहे. मानसिक आजारांविषयी जनजागृती होऊन त्यांची हेटाळणीपासून मुक्तता व्हावी तसंच मनोरुग्णांविषयीचे पूर्वग्रह दूर व्हावेत यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं  इर्डानं म्हटलं अाहे. 



हेही वाचा - 

पेंग्विनचं 'ते' पिल्लू पुढील दोन महिने राहणार घरट्यातच

Exclusive- भांडुप विषबाधा प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारा कंत्राटदार विनापरवाना!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा