Advertisement

आयआयटी बॉम्बेच्या मांसाहार वादात 'पेटा'ची उडी


आयआयटी बॉम्बेच्या मांसाहार वादात 'पेटा'ची उडी
SHARES

देशातील नामांकित शिक्षणसंस्थेपैकी एक असलेली आयआयटी बॉम्बे गेल्या काही दिवसांपासून व्हेज आणि नॉनवेजवरून वादात सापडली आहे. आता या वादात प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या 'पेटा' या संघटनेने उडी घेतली आहे. पेटाने या संघटनेने आयआयटी बॉम्बेला पत्र लिहून त्यांच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार खाण्यावर बंदी घालावी, अशी सूचना केली आहे.  


'म्हणून मांसाहारवर बंदी घाला'

खरंतर आयआयटीच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार जेवण बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यानंतर या संस्थेने मांसाहर जेवण बंद होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे पेटा या संस्थेने आयआयटीला बॉम्बेला एक पत्र लिहिलं आहे.

ज्यात पेटाने म्हटलंय 'शाकाहारी जेवण कोणीही करू शकतात. पण मांसाहार फक्त काहीच जण खाऊ शकतात. शिवाय मांसाहार अन्न शिजवण्यासाठी प्राण्यांचा बळी घेतला जातो. जे अत्यंत चुकीचं आहे. याचबरोबर मांसाहार केल्याने अनेक आजार जडतात. त्यामुळे मांसाहार न केल्यास हे आजार रोखले जाऊ शकतात.    


काय आहे वाद?

काही दिवसांपूर्वी आयआयटी बॉम्बे या शिक्षणसंस्थेने त्यांच्या वसतिगृहातील मांसाहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टीलची ताटे न वापरता, त्याऐवजी मांसाहार अन्नासोबत दिल्या जाण्याच्या प्लास्टिकच्या ताटांचा वापर करावा, असा ईमेल पाठवला होता. शिवाय तेथील मांसाहर जेवण बंद करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यानंतर या शिक्षण संस्थेकडून खुलासा करण्यात आला होता. आयआयटी बॉम्बेचं म्हणणं होतं की कॅन्टीनमध्ये मांसाहार शिजवण्यास परवानगी नसल्याने तेथे बाहेरून अन्न आणलं जात होतं. शिवाय ते अन्न रात्रीही दिलं जात होतं. ज्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता होती. त्यामुळेच मांसाहार जेवण बंद केलं असून यापुढे मांसाहार जेवण बंद होणार नसल्याचं आयआयटी बॉम्बेनं म्हटलं होतं.  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा