'२६ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी द्या' हायकोर्टात याचिका दाखल


SHARE

एका १३ वर्षांच्या गर्भवतीला गर्भपाताची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. २६ आठवड्याने गर्भवती असलेल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वडिलांनी गर्भपाताच्या परवानगीसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिच्या वडिलांनी 'आपली मुलगी बाळाला जन्म देण्यास मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मुलीला गर्भपाताची परवानगी द्यावी' अशी मागणी केली आहे.


बलात्कार पीडित आहे मुलगी

खरेतर १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी बलात्कार पीडित आहे. तिच्या नातेवाईकानेच वारंवार तिच्यावर बलात्कार केला. सात नोव्हेंबर रोजी ती मुलगी गर्भवती असल्याची माहिती उघड झाली. तीने आपल्या पोटात दुखत असल्याची बाब आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर तीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. जिथे तपासणीत ती गर्भवती असल्याचं निदर्शनात आलं. यानंतर तीच्या कुटुंबियांनी १७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली.


केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी

मुंबई हाईकोर्टाचे न्यायमूर्ती शांतनू केमकर आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे यासंदर्भात अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. यामुळे ती मुलगी शारीरिकदृष्ट्या गर्भपात करण्यास किती सक्षम आहे याची माहिती मिळू शकेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या