Advertisement

मुंबईत पेट्रोल ८४ रुपयांच्या खाली, १४ पैशांची कपात


मुंबईत पेट्रोल ८४ रुपयांच्या खाली, १४ पैशांची कपात
SHARES

मागील काही दिवसांपासून पेट्रोल अाणि डिझेलच्या भावात कपात सुरू अाहे. गुरूवारी पेट्रोलच्या दरात १४ पैशांची कपात करण्यात अाली. मुंबईत अाता पेट्रोलचा भाव प्रती लिटर ८४ रुपयांच्या खाली अाला अाहे. मुंबईत अाता पेट्रोलचा दर ८३.९२ रुपये अाणि डिझेलचा दर ७१.९९ रुपये झाला अाहे.


भाव घटण्याची शक्यता

तेल कंपन्यांकडून सातत्याने पेट्रोल अाणि डिझेलच्या दरात कपात सुरू अाहे. मागील २३ दिवसांमध्ये पेट्रोल प्रति लीटर २.२५ रुपयाने स्वस्त झाले अाहे. तर डिझेलचा दरही २३ दिवसात १.६७ रुपयाने घटला अाहे. अांतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मागील एका महिन्यात प्रति बॅरल ६ डाॅलरने कमी झाले अाहेत. २२ जूनला ओपेक देशांची बैठक होत अाहे. या बैठकीनंतर पेट्रोल अाणि डिझेलचे भाव अाणखी कमी होतील की नाही याचं चित्र स्पष्टं होईल. ओपेक देशांच्या बैठकीनंतर कच्च्या तेलाचे दर ६० डाॅलरपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त होत अाहे. 



हेही वाचा -

दिल्लीतील एनबीसीसी वडाळ्यात बांधणार १९८० लक्झरिअस घरं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा