Advertisement

मुंबईत पेट्रोल ७५ रुपयांच्या खाली


मुंबईत पेट्रोल ७५ रुपयांच्या खाली
SHARES

आतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत असल्याने मुंबईत पेट्रोलच्या दरांनी मोठ्या कालावधीनंतर प्रति लिटर ७५ च्या खालची पातळी गाठली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरांमध्ये २० पैसे, तर डिझेलच्या दरांमध्ये २३ पैशांची कपात करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७४.४७ रुपये आणि डिझेल ६५.७६ रुपये प्रति लिटरवर आलं आहे.


कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

मागील दीड महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे. याचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना मिळत असून हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न होत आहे. गुरूवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत ४.५ टक्के घसरण झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंड क्रूडचे दर घसरुन ५२ डाॅलरवर पोहोचले. कच्च्या तेलातील घसरणीचा थेट फायदा ग्राहकांना मिळत आहे.


४ आॅक्टोबरला होते सर्वाधिक दर

वर्षाच्या सुरूवातीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्याने यावर्षी ४ आॅक्टोबरला पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. मुंबईत या दिवशी पेट्रोलने प्रति लिटर ९१.३४ रुपयांचा दर गाठला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा