Advertisement

पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा घटले


पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा घटले
SHARES

गेल्या दोन आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. आता दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाडव्याला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

पेट्रोल प्रति लिटर २० पैसे आणि डिझेल प्रति लिटर १९ पैशाने स्वस्त झाल्याने मुंबईत पेट्रोल ८३ रुपये ७२ पैसे प्रति लिटर तर डिझेल ७६ रुपये ३८ पैसे प्रति लिटरने मिळत आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.


म्हणून दर घसरले

दिवाळीचा पहिला दिवस वगळल्यास गेल्या दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे सामान्यांना थोडासा का होईना मात्र दिलासा जरूर मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

१८ आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू असून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कपात केल्याचं दिसून येत आहे. मात्र निवडणुका संपल्यानंतर अर्थात डिसेंबर महिन्यात इंधनाचे दर पुन्हा भडकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा