Advertisement

दरवाढीला ब्रेक, पेट्रोल 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त

सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरता किरकोळ कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.16 रुपयांनी आणि डिझेल 73.73 रुपयांनी मिळत आहे.

दरवाढीला ब्रेक, पेट्रोल 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त
SHARES

पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 पैशांनी घट झाली. तर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरता किरकोळ कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 7 पैसे तर डिझेल 5 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.16 रुपयांनी आणि डिझेल 73.73 रुपयांनी मिळत आहे.


ही तर सामान्यांची थट्टा

सलग 16 दिवस इंधन दरात वाढ झाल्यानंतर बुधवारी पेट्रोल 59 आणि डिझेल 60 पैशांनी कमी केल्याचं तेल कंपन्यांनी जाहीर केलं. मात्र, दुपारी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने चूक मान्य करत इंधन दरात फक्त एक पैशांची कपात झाल्याचं सांगितलं. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. 

राजकीय पक्षांनी ही तर सामान्यांची थट्टा असं म्हणत सरकारवर टीकेची झोड उठवली. यासह तिकडे सोशल मीडियावर तेल कंपन्यांच्या चुकीबद्दल चांगलीच टीका झाली. या सर्व प्रकारानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलगिरी व्यक्त केली. याचसोबत इंधनाच्या किमती सरकार नाही तर तेल कंपन्या ठरवतात, असंही प्रधान यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

१४ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ

मुंबईत पेट्रोल नव्वदी गाठणार?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा