Advertisement

पेट्रोल झालं स्वस्त, फक्त एक पैशानं!


पेट्रोल झालं स्वस्त, फक्त एक पैशानं!
SHARES

गेले १६ दिवस दररोज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी नागरिक हैराण झाले असताना अाज सकाळी वाहनधारकांना मात्र काही प्रमाणात अानंद झाला. १७व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्या. पण एका पैशाने या किंमती कमी झाल्याचे कळताच वाहनचालकांच्या अानंदावर विरजण पडले.


तांत्रिक चुकीमुळे आनंदावर विरजण

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. त्यात पेट्रोलमध्ये ६० पैसे आणि डिझेलमध्ये ५७ पैशांची कपात झाल्याचा उल्लेख होता. परंतु एक तासाभरातच कंपन्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं सांगत दरांमध्ये बदल केले. वेबसाईटवर झालेल्या या चुकीमुळे ग्राहकांच्या आनंदावर मात्र विरजण पडले आहे.


पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले

गेले १६ दिवस पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढवण्यात येत असून ते गगनाला भिडत आहेत. मुंबईत बुधवारी पेट्राेलचा दर प्रतिलिटर ८६.२३ रुपये तर डिझेलचा भाव ७३.७८ रुपये अाहे. त्यामुळे देशातील नागरिक केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकार देत अाहे.


हेही वाचा -

मुंबईत पेट्रोल ४ रूपयांनी मिळणार स्वस्त!

सलग १६ व्या दिवशीही दरवाढ, पेट्रोल १६ पैशांनी महागलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा