Advertisement

मुंबईत पेट्रोल ४ रूपयांनी मिळणार स्वस्त!

इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अपयश येत असतानाच मनसेकडून पेट्रोलच्या दरात ४ रुपयांची सवलत दिली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ येत्या १४ जून रोजी मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर दुचाकी स्वारांना एकूण दराच्या ४ रुपये कमी दराने हे इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मुंबईत पेट्रोल ४ रूपयांनी मिळणार स्वस्त!
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील वर्षभरातच ९ ते १० रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच मागील पंधरा दिवसांपासून सलग पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मात्र, ही दरवाढ नियंत्रणात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अपयश येत असतानाच मनसेकडून पेट्रोलच्या दरात ४ रुपयांची सवलत दिली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ येत्या १४ जून रोजी मुंबईतील सर्व विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर दुचाकी स्वारांना एकूण दराच्या ४ रुपये कमी दराने हे इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे.


वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर सवलत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त मनसेने सवलतीत दुचाकीस्वारांना पेट्रोल उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. केंद्र सरकार एका बाजूला दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढवत आहेत. त्यामुळे अनेक मुंबईकरांना गाड्यांमध्ये पेट्रोल भरणेही आता अवघड झाले आहे.


३६ पेट्रोल पंपांवर मिळणार स्वस्त पेट्रोल

मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदार संघ असून यातील प्रत्येकी एक याप्रमाणे ३६ पेट्रोल पंपांवर मनसेकडून १४ जून रोजी पेट्रोलच्या एकूण दरापेक्षा ४ रुपये कमी दराने पेट्रोल उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पेट्रोल केवळ दुचाकीस्वारांसाठी असेल, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.


...मग सरकारला का शक्य नाही?

'केंद्रातील भाजपा सरकारला पेट्रोलचे दर कमी करता येत नाहीत. परंतु, मनसेचा केवळ एकमेव आमदार आणि एकमेव नगरसेवक असताना अशा प्रकारे ४ रुपयांची सवलत पेट्रोलमध्ये उपलब्ध करून देतो, मग सरकारला हे का शक्य नाही?' असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. 'मोदी सरकारचा निषेध करताना राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलमध्ये सवलत देऊन एक प्रकारे तरुणांना दिलासा देतानाच अनोख्या पद्धतीने साहेबांचा वाढदिवस साजरा करायचे आम्ही ठरवले असल्याचे' देशपांडे यांनी म्हटले आहे.



हेही वाचा

सलग १६ व्या दिवशीही दरवाढ, पेट्रोल १६ पैशांनी महागलं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा