पेट्रोल-डिझेलची दरवाढ सलग 15 व्या दिवशीही सुरूच


SHARE

मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याची मागणी जोर धरू लागलेली असताना यांच्या किंमतीत सलग 15 व्या दिवशीही वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 12 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 86 रुपये 8 पैशांवर पोहचले असून डिझेलचे दर प्रति लिटर 73 रुपये 64 पैशांवर पोहचले आहेत.


महागाईचा मार सामान्यांना

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा मार बसत आहे. 

मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याने रविवारी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधन दरवाढीवर लवकरच उपाययोजना आखण्याचं आश्वासन दिलं. तर तिकडे इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. पण अजूनही सरकार इंधन दर नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत आहे.


हेही वाचा - 

१४ व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ

डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

संबंधित विषय
ताज्या बातम्या