Advertisement

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा भव्य मोर्चा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी "भव्य मोर्चा" काढण्यात आला. या मोर्चाला ग्रँड हयात येथून सुरुवात झाली, तर त्याचा समारोप वांद्रे येथील कलेक्टर ऑफिस येथे करण्यात आला.

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचा भव्य मोर्चा
SHARES

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी "भव्य मोर्चा" काढण्यात आला. या मोर्चाला ग्रँड हयात येथून सुरुवात झाली, तर त्याचा समारोप वांद्रे येथील कलेक्टर ऑफिस येथे करण्यात आला.


महागाईने सर्वच हैराण

'देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हैराण झाला आहे. अशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मुंबईत सर्वात जास्त आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 85.29 रुपये आणि डिझेल 72.96 रुपये दराने विकला जात आहे. यामुळे मुंबईकरांची अक्षरशः पिळवणूक होत आहे. मुंबईकरांनी असं कोणतं पाप केलंय म्हणून हे भाजप सरकार मुंबईकरांना त्रास देत आहे. आज सर्व वस्तूंवर जीएसटी लागू असताना फक्त इंधनवर जीएसटी का लागू नाही? भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये का आणत नाही?' असा सवाल काँग्रेसचे मुबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी उपस्थित केला.


'इंधनही जीएसटीच्या कक्षेत आणा'

'जर पेट्रोल, डिझेल आणि पेट्रोलियम पदार्थ जीएसटी अंतर्गत आणले, तर नागरिकांना हा अनावश्यक कर द्यावा लागणार नाही. मुंबईकरांना अर्ध्या किंमतीत पेट्रोल आणि डिझेल मिळेल, यासाठीच भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल देखील जीएसटीच्या कक्षेत आणावी', अशी मागणी करत निरुपम यांनी भाजप सरकारविरोधात आगपाखड केली.  


गळ्यात घातली भाजीपाल्याची माळ

महागाईविरोधात भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसने आंदोलनाचं हत्यार उपसलं. यावेळी संजय निरुपम यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली होती. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन भाजप सरकारचा निषेध केला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सामील होत 'मोदी हटाव देश बचाव', 'नही चलेगी नही चलेगी', 'मोदीजी हाय हाय'च्या घोषणा दिल्या.


चक्का जाम आंदोलन

या मोर्चाचं रुपांतर रस्तारोकोत झाल्यानं काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.


हेही वाचा - 

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणणार- मुख्यमंत्री

डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा