Advertisement

मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९० रुपयांच्या पार

बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९० रुपयांच्या पार
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमत स्थिर होती. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९० रुपयांच्या पार गेल्यानं मुंबईकरांचं खिशाला कात्री लागली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं मागील २५ महिन्यांतील उच्चांक गाठला असल्याची माहिती समोर येत आहे. मागील ५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले होते. मात्र, बुधवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार, इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत ९१.०७ रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत ८७.१८ रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये २५ पैशांनी पेट्रोल महागले आहे. तर डिझेलची किंमत ८१.३४ रूपये प्रतिलिटर झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे डिझेलसह पेट्रोलच्या दरात २० पैशांहून अधिक वाढ झाली आहे.

पेट्रोलचे दर

  • दिल्ली – ८४.४५ रुपये प्रति लीटर
  • मुंबई – ९१.०७ रुपये प्रति लीटर
  • कोलकत्ता – ८५. ९२ रुपये प्रति लीटर
  • चेन्नई – ८७. १८ रुपये प्रति लीटर

डिझेलचे दर

  • दिल्ली – ७४.६३ रुपये प्रति लीटर
  • मुंबई – ८१.३४ रुपये प्रति लीटर
  • कोलकत्ता – ७८.२२ रुपये प्रति लीटर
  • चेन्नई – ७९. ९५ रुपये प्रति लीटर
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा