Advertisement

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागलं आहे. आठवडाभरात पेट्रोल १ रुपया ३८ पैसे, तर डिझेल १ रुपया ६० पैशांनी महाग झालं आहे.

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
SHARES

पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागलं आहे. बुधवारी पेट्रोलच्या दरात २४ पैशांची तर डिझेलच्या दरात २७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. 

दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९८.३६ रुपये तर डिझेलचा दर ८९.७५ रुपये झाला आहे. महाराष्ट्रामध्ये परभणीत पेट्रोलचा भाव १०० रुपयांच्या वर गेला आहे. मुंबईतही लवकरच पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने पेट्रोलियम कंपन्या रोज इंधनांचे दर वाढवत आहेत. आठवडाभरात पेट्रोल १ रुपया ३८ पैसे, तर डिझेल १ रुपया ६० पैशांनी महाग झालं आहे.

या वर्षात ३१ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. तर ४ वेळा किंमती कमी झाल्या आहेत.  जानेवारीत १० वेळा आणि फेब्रुवारीमध्ये १६ वेळा पेट्रोल, डिझेल महागलं आहे. तर मार्चमध्ये ३ वेळा आणि एप्रिलमध्ये १ वेळा किमती कमी झाल्या आहेत.



हेही वाचा - 

सहकारी बँक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी मुभा नाही

देशात प्रवासासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक नाही

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा