Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरूच


पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरूच
SHARES

देशभरात इंधन दरवाढीच सत्र सुरूच आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोल प्रति लिटरमागे १५ पैशांनी तर डिझेल सात पैशांनी महागले. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर लीटरमागे ८९.४४ रुपये आणि डिझेलच्या एक लिटरसाठी ७८.३३ रुपये मोजावे लागत आहे.

रविवारी पेट्रोलचे दर २८ पैशांनी तर डिझेलचे भाव १८ पैशांनी वाढले. तर दुसऱ्या दिवशी सोमवारी मुंबईत पेट्रोल ८९.४४ रुपयांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७८.३३ रुपये झाले आहेत. तर दिल्लीतही पेट्रोल १५ पैशांनी तर डिझेल सहा पैशांनी महागले.


जीवानावश्यक वस्तूही महागल्या

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्यांचे कंबरडे पुरते मोडलं आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.


भारत बंदनंतरही...

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिल्यानंतरही भाव काही उतरले नाहीत. गेल्या १५ दिवसांत पेट्रोलच्या भाववाढीचा आलेख सतत उंचावत चालला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८६.०९ रुपयांना मिळत होतं. आता १५ दिवसांत ते ८९.४४ रुपयांना मिळत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा