Advertisement

पेट्रोल, डिझेलची दरवाढ, मुंबईत पेट्रोल ८३ रूपयांवर

सलग नवव्या दिवशी दरात वाढ केली आहे.

पेट्रोल, डिझेलची दरवाढ, मुंबईत पेट्रोल ८३ रूपयांवर
SHARES

देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रेल व डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सलग नवव्या दिवशी दरात वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली. परिणामी मुंबईत पेट्रोलचे दर ८३ रूपयांच्या पुढे गेले आहेत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ६२ पैसे आणि ६४ पैशांची वाढ करण्यात आली होती.

दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.२६ रूपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ७४.६२ रूपये प्रती लीटर इतके झाले आहेत. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ८३.१७ रूपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ७३.२१ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ७९.९६ रूपये प्रती लीटर आणि ७२.६९ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ७८.१० रूपये प्रती लीटर आणि ७०.३३ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी ६ वाजल्यापासूनच हे नवे दर लागू करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा