Advertisement

वर्षाच्या अखेरच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे भाव...! जाणून घ्या आजचे दर


वर्षाच्या अखेरच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे भाव...! जाणून घ्या आजचे दर
SHARES

शुक्रवार हा २०२१ या वर्षाचा अखेरचा दिवस असून, सर्वत्र नवीन वर्षाच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आजच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. देशात सलग ५७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरु आहेत. परंतु, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ३१ डिसेंबर रोजी कोणताही बदल झालेला नाही. इंधन कंपन्यांकडून ग्राहकांना दिलासा देण्यात आला नाही. इंधनाच्या वाढलेल्या दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारच आपले कर कमी करत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

आजही तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या दीड महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी ४ डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे.

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पेट्रोलची किंमत १०९.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९२.२५ रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत ९५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत ८९.७९ रुपये आणि पेट्रोल १०४.६७ रुपयांनी विकलं जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा