Advertisement

बोरीवलीत जलवाहिनी फुटून गाड्यांचं नुकसान


बोरीवलीत जलवाहिनी फुटून गाड्यांचं नुकसान
SHARES

बोरीवली चिकू वाडी येथे सोमवारी मध्य रात्री जलवाहिनी फुटून पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह अतिदाबाने असल्याने गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झालं आहे. दरम्यान या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने हाती घेऊन मंगळवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळी या भागातील पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला होता.


लाखो लिटर पाणी वाया

बोरीवली पश्चिम येथील आर.एम.भट रोडवरील बीबीसी सेंटरजवळ सोमवारी उत्तररात्री जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेलं. फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह अति दाबाने असल्याने याठिकाणी असलेल्या गाड्यांचे तसेच संरक्षक भिंतीचे नुकसान झाले.



ही जलवाहिनी फुटल्याने गोराई १, २ आणि ३ सह जुनी एम.एच.बी. कॉलनी, न्यू एम.एच.बी कॉलनी, धर्मा नगर, योगी नगर आणि वझिरा नाका येथील रहिवाशांना मंगळवारी होणारी पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन नगरसेविका श्वेता कोरगावकर, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम प्रशासनाशी पाठपुरावा करून युद्धपातळीवर करून घेतले.


पाण्याच्या अतिदाबाने नुकसान

पाण्याच्या अतिदाबाने अनेक गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाले असून रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक उखडले गेले आहे. याशिवाय संरक्षक भिंतही तुटून अनेक भागांमध्ये पाणी साचून परिसर जलमय झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत पाण्याचा पुरवठा पूर्वव्रत केला असल्याचं माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी सांगितलं.

पाण्याचा दाब अधिक असल्याने याठिकाण उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झालं. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून सकाळी काही भागांमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा झाला होता. परंतु, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाण्याचा पुरवठा सुरळीत झाला.

रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, आर-मध्य विभाग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा