लाखो लिटर पाण्याची नासाडी

 Gavhan Gaon
लाखो लिटर पाण्याची नासाडी

गव्हाण गाव - चेंबूरच्या गव्हाण गाव परिसरात काही पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होतेय. या परिसरात अनेक तेल कंपन्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून खोदकाम करताना ही जलवाहिनी फुटली असावी, असा संशय स्थानिक रहिवासी दयाशंकर पुजारी यांनी व्यक्त केलाय. याबाबत त्यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार केली. मात्र पालिकेचा एकही अधिकारी फिरकलेला नाही.

Loading Comments