मेट्रोच्या कामामुळे पाइपलाइन फुटली

मालाड - मेट्रोच्या कामामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर शनिवारी दुपारी पाइपलाइन फुटली. दुपारी अडीचच्या सुमारास जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना पाइपलाइन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं. मालाडच्या पुष्पापार्कजवळ हा प्रकार घडला. फुटलेल्या पाइपलाइनमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड होता त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी घुसण्याची भीतीही निर्माण झाली.

Loading Comments