खेळाचे मैदान की पार्किंग लॉट

 Andheri
खेळाचे मैदान की पार्किंग लॉट
खेळाचे मैदान की पार्किंग लॉट
खेळाचे मैदान की पार्किंग लॉट
खेळाचे मैदान की पार्किंग लॉट
खेळाचे मैदान की पार्किंग लॉट
See all

अंधेरी - येथील पश्चिमेच्या आदर्शनगर, न्यू लिंक रोड ,शिवम टॉवरसमोर खेळाच्या मैदानासाठी राखीव जागा आहे. अनेक वर्षांपासून भूखंड तसाच पडून राहिल्यानं या मैदानात आता सर्रास पार्किंग होऊ लागलंय. त्यामुळे आदर्शनगर, शक्तीनगर, गणेशनगर परिसरातल्या मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिलेली नाहीये. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनानं या मैदानाकडे जणू पाठच फिरवलीये. याबाबत स्थानिक रहिवासी डॉ. श्रीधर जोशी सांगतात की, ''मैदानाला संरक्षक भिंत नसल्यानं रात्री या मैदानाचा शौचासाठी वापर होतोय. त्यामुळे मुलांना खेळणं तर सोडा फिरकणंही कठीण झालंय. अनेक वर्षांपासून मैदानाच्या सुशोभीकरणासाठी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. पण कुणीही याकडे लक्ष देत नाही. फक्त आश्वासनंच दिली जातायत.'

Loading Comments