यांना अभय कुणाचं?

कफ परेड - विनापरवाना वाळू, सिमेंटचा व्यवसाय सुरू असल्याने कफ परेडच्या महात्मा फुले नगरमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यांना रोज अडचणींचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. रहिवाशांनी तक्रार करूनही याची दखल कुणाकडूनही घेण्यात आलेली नाही. गणेशोत्सवाच्या वेळी या ठिकाणी दरवर्षी गणपतीची स्थापना आणि विविध कार्यक्रम केले जातात. पण आता अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने इथे अतिक्रमण करत सिमेंट, वाळू, विटांच्या गोण्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

Loading Comments