झकेरीया मस्जिद बसस्टॉपची दुरवस्था

 Bhendi Bazaar
झकेरीया मस्जिद बसस्टॉपची दुरवस्था

भेंडी बाजार - जुन्या पेव्हर ब्लॉकची डेब्रिजनी भरलेली पोती गेल्या कित्येक दिवसापासून भेंडी बाझारच्या झकेरिया मस्जिद या बसस्टॉपसमोर पडून आहेत. त्यामुळे प्रवाशांना रोज अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथे काही दिवसांपूर्वी बस स्थानकाच्या मागील बाजूचे पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले होते. पण काम होताच जुन्या पेव्हर ब्लॉकची योग्य तऱ्हेने विल्हेवाट न लावता ते डेब्रिज बस स्टॉपच्या समोर ठेवले आहे. या संदर्भात प्रवासी अहमद सय्यद यांना विचारले असता 'यामुळे रोज समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ही पोती लवकर उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे'.

Loading Comments