वर्सोवात कचरा मुक्त अभियान

 Andheri
वर्सोवात कचरा मुक्त अभियान
वर्सोवात कचरा मुक्त अभियान
वर्सोवात कचरा मुक्त अभियान
वर्सोवात कचरा मुक्त अभियान
वर्सोवात कचरा मुक्त अभियान
See all

वर्सोवा - कचरा आणि डेंग्यू मुक्ती अभियानांतर्गत भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली वर्सोवा येथील वॉर्ड 61, 63 मध्ये 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाचपर्यंत कुरेशी कंपाउंड तसंच एव्हरशाइन कॉस्मिक सोसायटीसमोर साफसफाई करण्यात आली. या परिसरात अनेक दिवसांपासून साचलेला कचरा मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीनं उचलण्यात आला. या परिसरातल्या तीन घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे तेथे मनपा कर्मचाऱ्यांनी फवारणी केली. अभियानात वर्सोवा विधानसभा अध्यक्ष कमलेश शर्मा, महामंत्री रवी गुप्ता, निलेश दाभोळकर, गोविंद महावरकर, महिला उपाध्यक्ष उर्मिला गुप्ता, रंजना पाटील, किरण गुलानी, सुनील मौर्या, महेश चव्हाण, राजा चव्हाण आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments