Advertisement

गारगाई धरण आणि भांडुप प्रकल्पासाठी पालिकेकडून भूखंड

दरम्यान, मुंबई महापालिकेने त्यांच्या भांडुप कॉम्प्लेक्समध्ये एक नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे कामही हाती घेतले आहे. या कॉम्प्लेक्सला ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर आणि तानसा तलावांमधून पाणी येते.

गारगाई धरण आणि भांडुप प्रकल्पासाठी पालिकेकडून भूखंड
SHARES

गारगाई धरण प्रकल्पाचा भाग म्हणून महापालिकेने तानसा तलावाच्या पायथ्याशी 10,000 हून अधिक झाडांचे भरपाई म्हणून वनीकरण केले आहे. यामुळे मुंबई (mumbai) महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) सध्याच्या 4,000 एमएलडी पुरवठ्यात दररोज 400 दशलक्ष लिटर (MLD) अतिरिक्त पाणी मिळण्याची अपेक्षा आहे.

या एप्रिलमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने धरण बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली तरी अद्याप राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. असे मुंबई महापालिका हायड्रॉलिक अभियंता पुरुषोत्तम मालवडे यांनी सांगितले. मंजुरी प्रक्रिया सुरू असताना महापालिकेने (bmc) भरपाई देणारे हिरवळीकरण सुरू ठेवण्याची योजना आखली आहे.

गारगाई प्रकल्पासाठी सुमारे 2,92,000 झाडे तोडली जातील. "आम्ही नुकसान कमीत कमी करण्याचा आणि शक्य तितक्या झाडांची पुनर्लावणी करण्याचा प्रयत्न करत आहोत," असे  पुरुषोत्तम मालवाडे म्हणाले.

या प्रकल्पासाठी सहा गावांना स्थलांतरीत करण्याची आवश्यकता भासणार आहे. "ओगडा आणि खोडाडे गावांच्या स्थलांतरातून मिळालेल्या क्षेत्रावर प्रकल्पाची बांधणी होणार आहे. तसेच उर्वरित अतिरिक्त जागेचा वापर वनीकरणासाठी वापरला जाईल," असे ते म्हणाले.

दरम्यान, मुंबई महापालिकेने त्यांच्या भांडुप (bhadup) कॉम्प्लेक्समध्ये एक नवीन जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे कामही हाती घेतले आहे. या कॉम्प्लेक्सला ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर आणि तानसा तलावांमधून पाणी येते.

सध्याचे जलशुद्धीकरण केंद्र 100 वर्षांहून अधिक जुने आहे. तथापि, पाण्याचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नवीन प्रकल्प बांधल्यानंतरच तो पाडता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लूक

पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा