Advertisement

डाॅ. आंबेडकर स्मारकाला महिन्याभरात सुरूवात- मुख्यमंत्री


डाॅ. आंबेडकर स्मारकाला महिन्याभरात सुरूवात- मुख्यमंत्री
SHARES

डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनी बाबासाहेबांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी 'इंदू मिल येथे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला महिनाभरात सुरुवात होईल, त्यासाठी टेंडर निघालं आहेअशी माहिती फडणवीस यांनी दिली. 




डाॅ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.  





अनुयायांची राहण्याची व्यवस्था ७० शाळांत 

ओखी वादळामुळे मंगळवारी मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने शिवाजी पार्कच्या मैदानावर सर्वत्र चिखल साचला. त्यामुळे प्रशासनाने आंबेडकरी अनुयायांची राहण्याची व्यवस्था दादर परिसरातील ७० शाळांमध्ये केली आहे. येथे अनुयायांसाठी मोफत औषधोपचाराची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच बेस्टने जादा बसगाड्या देखील सोडल्या आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा