पोलीस श्वानांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान!

 Parel
पोलीस श्वानांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान!
Parel, Mumbai  -  

विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार झालेला आपण पाहिला आहे. मात्र परळच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने चक्क सेवानिवृत्त झालेल्या 30 श्वानांचा सत्कार करण्यात आला. पशू महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ. संदीप कारखानीस, आयपीएस अधिकारी संजय सक्सेना, माजी पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांच्या हस्ते रविवारी या श्वानांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अॅनिमल एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका रोहिणी फर्नांडिस, डॉ. आशिष पातुरकर, अभिनेत्री सई ताम्हणकर, एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

परळच्या पशूवैद्यकीय महाविद्यालयातील 2015-16 सालच्या बॅचमधील विदयार्थ्यांनी रील लाइफ पेक्षा रियल लाइफ हिरो म्हणजेच श्वान यांचा सत्कार करण्याची संकल्पना गेल्या वर्षी राबवली होती. त्यावेळी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने 2016-17 मध्ये देखील विद्यार्थी परिषदेत ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे जीआरपी, आरपीएफ, सीआयएसएफ, बीडीडीएस, एनडीआरएफ, विमानतळ कस्टम आदी 18 खात्यातील सेवानिवृत्त झालेल्या एकूण 30 श्वानांचा सत्कार करण्यात आला असून त्यापैकी 6 श्वानांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.त्यात प्रामुख्याने 2006 साली पश्चिम रेल्वेमधिल साखळी बॉम्बस्फोटात उत्तम कामगीरी बजावलेल्या श्वानांपैकी मॅक्स, सँडी, ऑस्कर, शॉटगन आणि नोटी या श्वानांचा समावेश आहे. या सत्कारात श्वानांना त्यांचे नाव कोरलेली नेमप्लेट, प्रमाणपत्र, सुवर्णपदक, गळपट्टा, गुडी बॅग देखील देण्यात आली. हे सर्व श्वान साधारण 10 ते 12 या वयोगटातील होते.

Loading Comments