Advertisement

मुंबईत विद्युत वाहनांच्या विक्रीत वाढ

केंद्राच्या आवाहनाला अनुसरून मुंबईत विद्युत वाहनांची संख्या झपाट्यानं वाढती आहे.

मुंबईत विद्युत वाहनांच्या विक्रीत वाढ
SHARES

केंद्राच्या आवाहनाला अनुसरून मुंबईत विद्युत वाहनांची संख्या झपाट्यानं वाढती आहे. देशाच्या एकूण विक्रीत मुंबईतील वाहनांचा आकडा १९ टक्के आहे. इन्फोमेरिक्स व्हॅल्युएशन अँड रेटिंग या संस्थेनं या संबंधी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात २०२१ या वर्षात एकूण वाहनविक्रीत घट झाली आहे. 

या सर्वेक्षणानुसार २०२१ या वर्षात जवळपास १.२३ लाख विद्युत वाहने देशभरात विक्री झाली. हा आकडा २०२०मध्ये १.३३ लाख होता. एकूणच वाहन क्षेत्रातील मागणी कमी असल्यानं ही मागणी झाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात १.२३ लाख विद्युत वाहनांची विक्री झाली असताना मुंबईतील त्याचा हिस्सा जवळपास २३ हजार अर्थात १९ टक्के आहे. २०२१मध्ये मुंबईतील विद्युत वाहनविक्रीत तब्बल १५३ टक्क्यांची वाढ दिसून आली. २०२०मध्ये मुंबईत जेमतेम ९५०० विद्युत वाहनांची विक्री झाली होती.

मुंबईचा विचार केल्यास वाहनांसाठीची चार्जिंग स्थानके येथे फार कमी आहेत. येथील चार्जिंग केंद्रांचा आकडा फक्त २५ च्या घरात आहे. तसे असतानादेखील नागरिक मोठ्या प्रमाणात विद्युत वाहनांची खरेदी करीत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा