फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू

 Mazagaon
फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू
फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू
फायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू
See all

भायखळा - महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात 10 डिसेंबर 2016 रोजी केबलमध्ये अडकलेला ससाणा पक्षी काढताना अग्निशमन दलाचे तीन अधिकारी जखमी झाले होते. त्यातील एक फायरमन राजेंद्र भोजने यांचा शनिवारी रात्री उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र भोजने यांना ‘शहीद’ दर्जा देण्यात येईल अशी लेखी हमी देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मात्र, मागणी मान्य न झाल्यानं राजेंद्र भोजने यांच्या कुटुंबीयांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. 12 तास उलटले तरी प्रशासनानं काहीही हालचाल न केल्यानं अखेर भोजने कुटुंबीयांनी राजेंद्र भोजने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Loading Comments