मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'

 Dalmia Estate
मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'
मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'
मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'
मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'
मुलुंडमधील खड्डे 'जैसे थे'
See all

मुलुंड - रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबईत सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली मुदतही संपत आलीये. पण मुलुंडच्या रस्त्यांवरील खड्डे मात्र 'जैसे थे'च आहेत.

मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत मुलुंडच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रमाण कमी आहे. तरीही मिठागर रोड, नवघर रोड, म्हाडा कॉलनी, पाच रस्ता भागांत रस्त्यावर खड्डे आहेत.

'मिठागर रोडवरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम एप्रिलमध्ये सुरू झालं होतं. पण अर्धं काम होताच, हे काम बंद झालं. आता या रस्त्यावर खड्ड्यांचं प्रमाण वाढलंय. तरी तिथे दुरुस्ती मात्र करण्यात आलेली नाही', अशी माहिती स्थानिकांनी दिली. या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशीही त्यांची मागणी आहे.

Loading Comments