Advertisement

मुंबई, ठाण्यातल्या काही भागात वीज पुरवठा खंडित

मुंबईतील दादर, वांद्रे, माहिम आणि सांताक्रुझ परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला.

मुंबई, ठाण्यातल्या काही भागात वीज पुरवठा खंडित
SHARES

मुंबईतील दादर परिसरात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित (power outage in Mumbai) झाला होता. साधारणत: अर्ध्यातासानं मुंबईतल्या काही भागांमधील वीज पुरवठा आता सुरळीत झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील दादर, वांद्रे, माहिम आणि सांताक्रुझ परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. काही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

वीज पुरवढा खंडित झाल्यानं बेस्ट कडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास कळवा-पडघा इथल्या ४०० केव्हीची लाईन ट्रिप झाली. याचा परिणाम म्हणजे मुंबई, ठाणे परिसरात होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं.

दादरसह (dadar) ठाणे, पालघर, नालासोपारा, नवी मुंबई, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसंच हा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून एक ते दीड तास लागणार असल्याची प्राथमिक माहिती महावितरणनं दिली आहे.

याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दादर इथल्या एका कार्यक्रमातही तब्बल अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यास उशीर होता. दरम्यान, अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कडाक्याचा उकाडा आणि त्यात वीज गेल्यानं नागरिक चांगलेच हैरान झाले होते.

पडघा येथील मेन लाईन ट्रिप झाल्याने त्याचा फटका राज्यपालांच्या कार्यक्रमालाही बसला आहे. दादर येथे पडघ्यातून 400 केव्हीचा वीज पुरवठा होतो. पण पडघ्यातील विद्यूत केंद्रातील बिघाडाचा दादरलाही फटका बसला. दादरच्या महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स गाईड्सच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता.


हेही वाचा

ठाण्यातील लाकूड गोडाऊनला भीषण आग

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण लांबणीवर, 'हे' आहे कारण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा