Advertisement

महापालिका चिटणीसपदी प्रकाश जेकटे


महापालिका चिटणीसपदी प्रकाश जेकटे
SHARES

मुंबई महापालिकेच्या चिटणीसपदी कोण बसणार? या चर्चेला अखेर बुधवारी पूर्णविराम मिळाला. महापालिका चिटणीस नारायण पठाडे बुधवारी सेवानिवृत्त झाल्यामुळे या रिक्त जागी उप चिटणीस प्रकाश जेकटे यांची नियुक्ती करण्यता आली आहे. प्रभारी चिटणीस म्हणून जेकटे यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

महापालिका चिटणीस नारायण पठाडे हे 2012 पासून या पदावर कार्यरत होते. सलग पाच वर्षे या पदावर कार्यरत असलेले नारायण पठाडे बुधवारी 31 मे 2017 ला सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या रिक्तपदावर नियुक्ती करण्यासाठी उपचिटणीस रजनीकांत संख्ये आणि प्रकाश जेकटे यांचे प्रस्ताव सामान्य प्रशासनाने प्रमोशन समितीपुढे पाठवले होते. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी उपचिटणीस प्रकाश जेकटे यांची चिटणीस पदी प्रभारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश प्राप्त झाले.

महापालिका चिटणीस पदावर नियमित तत्त्वावर नियुक्ती होईपर्यंत जेकटे यांच्याकडे त्यांच्या स्वत:च्या पदाच्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामकाज म्हणून महापालिका चिटणीस या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सोपवण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. बुधवारी संध्याकाळी हे आदेश प्राप्त झाल्यानंतर नारायण पठाडे यांनी प्रकाश जेकटे यांच्याकडे आपला पदभार सोपवला.

प्रेमलता मोरे आणि मानकर सेवानिवृत्त-
महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांच्याबरोबरच उपचिटणीस प्रेमलता मोरे आणि सहायक महापालिका चिटणीस विजयकुमार मानकर हे देखील बुधवारी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या दोघांना महापालिका चिटणीस विभागातील शिपाईवर्ग तसेच लिपिक आणि अधिकारी आदींनी भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा