प्रतीक्षानगरमधील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटला!

 Antop Hill
प्रतीक्षानगरमधील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटला!

गेले काही दिवस सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या प्रतीक्षानगरमधील राहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. प्रतीक्षानगरमधील इमारत क्र. 12 आणि 15 मध्ये अपुरा तसेच अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर होता. पाण्याच्या कॉकभोवती अस्वच्छता असल्याने अशुद्ध पाणी प्यावे लागत होते. मात्र आता पाण्याच्या कॉकभोवती असलेली घाण स्वच्छ करण्यात आली आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांना सध्यातरी स्वच्छ पाणीपुरवठा होत आहे.

तात्पुरता उपाय का होईना परंतु आधीपेक्षा आता सध्या तरी नियमित पाणी मिळत आहे. 

अंबिका अल्ले, रहिवासी

परंतु पाणीपुरवठा समस्येचा हा तोडगा तात्पुरता काढला गेला असून त्यावर समाधानकारक कायमस्वरूपी उपाय हा देखील लवकर काढला जाईल 

प्रल्हाद ठोंबरे, स्थानिक नगरसेवक 

Loading Comments