Advertisement

चौकाच्या दुरावस्थेमुळे स्थानिक त्रस्त


चौकाच्या दुरावस्थेमुळे स्थानिक त्रस्त
SHARES

गोरेगाव - प्रेमनगर रोड येथील चौकाची दुरावस्था झाली आहे. तुटलेल्या लाद्या, झाडांमध्ये पडलेला कचऱ्याचा खच, सभोवती दुचाकी पार्किंग अशी बकाल अवस्था चौकाची झाली आहे. त्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला असून, स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाच वर्षांपूर्वी मोळक्या जागेवर कचरा टाकला जात असल्यामुळे त्यावेळचे नगरसेवक समीर देसाई यांनी तेथे चौक बांधून सुशोभिकरण केले होते. मात्र त्यानंतर त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने त्या चौकाची दुरावस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहिती नुसार, चौकातील झुडपात रात्री मद्यपान देखील केले जाते. याचा त्रास समोरच असलेल्या रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील होतो. त्यामुळे या चौकाची दुरुस्ती करावी अथवा ते हटवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होतेय.

याबाबत पी उत्तर पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांना विचारले असता, संबंधित विभागाला सांगून त्याची पाहणी करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा