Advertisement

प्रा. वामन केंद्रे, शंकर महादेवन, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री प्रदान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यक्रर्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे तसंच गायक शंकर महादेवन यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

प्रा. वामन केंद्रे, शंकर महादेवन, कोल्हे दाम्पत्याला पद्मश्री प्रदान
SHARES

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी नाट्यकर्मी प्रा. वामन केंद्रे, सामाजिक कार्यक्रर्ते डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे तसंच गायक शंकर महादेवन यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला.


राज्यातील चौघांचा सन्मान

पहिल्या टप्प्यात ८ मान्यवरांना पद्मभूषण तर ३९ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.  यात महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. रवींद्र आणि डॉ.  स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कोल्हे दाम्पत्याने ३४ वर्षांहून अधिक काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी बहुल भागात गोरगरीब आणि वंचितांना आरोग्यसेवा प्रदान केली आहे.

तर प्रसिद्ध नाट्य कलाकार व नाट्य दिग्दर्शक तथा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना कला क्षेत्रातातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.  प्रा. केंद्रे यांनी सलग ३५ वर्ष नाट्यशिक्षण दिलं आहे. तसंच, देश परदेशात प्रा. केंद्रे यांनी नाट्य प्रशिक्षण विषयक कार्यशाळांचं यशस्वी आयोजन केलं आहे.

प्रसिद्ध गायक आणि संगीत संयोजक शंकर महादेवन यांनी कला क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महादेवन यांनी आतापर्यंत विविध भाषांमध्ये ३ हजारांहून अधिक गीतं गायली आहेत. आता १६ मार्च  रोजी पुढील टप्प्यातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.




हेही वाचा -                   

कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर?

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय


                    

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा