Advertisement

इराण युद्धामुळे भारतातील वस्तूंच्या दरात वाढ

यात कच्चे तेल, बदाम, खजूर, खारीक, मणुके या वस्तूंचा समावेश आहे.

इराण युद्धामुळे भारतातील वस्तूंच्या दरात वाढ
SHARES

इराण व इस्रायल यांच्यातील युद्धाचा इराणमधून होणाऱ्या आयातीवर परिणाम होत आहे. इराणमधून भारतात येणाऱ्या वस्तूंचे दर वाढण्याची (price increased) शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी इराणमधून 3 हजार 747 कोटींची आयात झाली आहे. यात कच्चे तेल, बदाम (almonds), खजूर, खारीक, मणुके या वस्तूंचा समावेश आहे.

इराण (iran) आणि भारतातील संबंध चांगले असल्याने दोन्ही देशांमध्ये चांगला व्यापार होतो. इराणमधून भारतात लसूण, सफरचंद, काबुली चणे, बदाम, सुके खजूर, ओले खजूर, मणुके, किवी, केशर, हिंग, मीठ, मिथेनॉल या बाबींची आयात होते.

तसेच भारतातून (india) इराणमध्ये बासमती तांदूळ, केळी, कॉफी, चणे, हळद, औषधे यांची निर्यात केली जाते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात इराणमधून 5 हजार 176.52 कोटींची आयात झाली होती. गेल्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये मात्र आयातीत घट होऊन हा आकडा 3 हजार 474.61 कोटींवर आला.

सध्या इराणमधून भारतात येणाऱ्या मालावर परिणाम झालेला नाही. मात्र, युद्ध चिघळून इराणवर काही निर्बंध लादले गेल्यास भारतात माल पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे संबंधित वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.

खाद्यतेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ झाली आहे. परिणामी भारतीय आयातदारांनी 65 हजार टनांचे करार रद्द केले आहेत. पश्चिम आशियातील युद्ध स्थितीमुळे येत्या काळात इंधनाचे दर वधारण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जगभरातील प्रमुख खाद्यतेल आयातदार देशांनी पामतेलाचा उपयोगावर भर दिला आहे. पामतेलाचा उपयोग आता जैविक इंधनासाठी करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात पामतेलाचे दर नीचांकावर होते. आता मात्र त्यात एकाएकी 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळेच आयातदारांनी 65 हजार टनांचे करार रद्द केले आहेत.



हेही वाचा

रेल्वेचा प्रवास महागणार! 1 जुलैपासून भाडेवाढ

कल्याण डोंबिवलीकरांचा रिक्षा प्रवास महागला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा