खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्यातील खासगी विद्यापीठांसाठी ऑफ कॅम्पस सुरू करण्याच्या अटींबाबत प्रश्न उपस्थित केला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ऑफ-कॅम्पस सुरू करण्यासाठी खासगी विद्यापीठांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तसेच ज्या विद्यापीठात ऑफ-कॅम्पस सुरू करावयाचा आहे, त्या विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागेल. सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्यातील खासगी विद्यापीठांसाठी ऑफ कॅम्पस सुरू करण्याच्या अटींबाबत प्रश्न उपस्थित केला.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, खासगी विद्यापीठांनी महाविद्यालये सुरू केल्यास आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना 10 टक्के आरक्षण देण्याची अट आहे. तसेच, जे विद्यापीठ परिसरात ऑफ-कॅम्पस सुरू करणार आहेत, त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. 2001 पूर्वी 78 जीके महाविद्यालयांना दिलेल्या या अनुदानाच्या आर्थिक भाराचा पूर्ण अभ्यास करून हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा