Advertisement

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातल्या ५० पर्यटन स्थळांवर बंदी

वॉटरफॉल, किल्ले आदी लोकप्रिय ठिकाणांसाठी कलम १४४ अंतर्गत आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातल्या ५० पर्यटन स्थळांवर बंदी
SHARES

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस (COVID-19) रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. हा प्रसार लक्षात घेऊन, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार, ११ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्यातील आणि आसपासच्या ५०हून अधिक पर्यटन स्थळांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

अहवालानुसार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सीआरपीसीच्या कलम १४४ अंतर्गत कार्यकारी आदेश जारी केला. लवासा, पानशेत, भुशी, टेमघर आणि खडकवासला, आंबेगाव, बजोर, हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांतील पर्यटन स्थळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लोहगड, तोरणा, सिंहगड, शिवनेरी आदी किल्ल्यांचा देखील यात समावेश आहे.

अधिका-यांनी माहिती दिली आहे की, अनेक पर्यटक सुट्ट्या आणि पीक सीझनमध्ये या स्थळांना भेट देतात. याचाच विचार करून, पायी जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गर्दीचे व्यवस्थापन करताना कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू करणं गरजेचं आहे. तसंच सामाजिक अंतर, मास्क घालणे आणि इतर प्रोटोकॉल यासंबंधी लागू केलेल्या कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केलं जात आहे.

पुणे आणि आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट १६ टक्के नोंदवला गेला. मंगळवारी, पुण्यात एकूण ३४०० हून अधिक नवीन कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेली. सक्रिय रुग्णांची संख्या १९,०००हून अधिक झाली.

आजपर्यंत पुण्यात कोविड संसर्गामुळे ९१०० हून अधिक मृत्यू झाले आहेत. मंगळवार, ११ जानेवारी २०२२ रोजी, जिल्ह्यात ६१०० हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामुळे सकारात्मकता दर २१ टक्के झाला. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १२ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा

सेल्फ टेस्ट किटवर लवकरच येणार बंधन

विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करा, पोलिसांना टार्गेट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा