Advertisement

मुंबईत मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी, पालिका उचलणार कडक पावलं

कोरोना काळात महापालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. त्यामुळे मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करण्यावर मुंबई महापालिकेचा भर आहे.

मुंबईत मालमत्ता कराची २० हजार कोटींची थकबाकी, पालिका उचलणार कडक पावलं
SHARES

मुंबईत मालमत्ता कराची थकबाकी तब्बल २० हजार कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर मुंबई महापालिका आता कठोर कारवाई करणार आहे. या मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी पालिकेने ८ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत कराची थकबाकी न भरल्यास दंड वसुली केली जाणार आहे.

कोरोना काळात महापालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं आहे. त्यामुळे  मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करण्यावर मुंबई महापालिकेचा भर आहे.  काही मालमत्ताधारक वारंवार सूचना करुनही थकित रक्कम भरण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांना ८ एप्रिलपर्यंत थकबाकी भरण्याची मुदत देण्यात आली आहे. ९ एप्रिलपासून त्यांच्याकडून अतिरिक्त दंड वसूल केला जाणार आहे.

पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या ३३९२  मालमत्ताधारकांवर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कारवाईचा बडगा उगारला. यापैकी १३७६ कोटी रुपये कर थकवणाऱ्या ३१७९ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. त्यानंतर आठवडाभरातच  ३५० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. अद्याप मालमत्ता कराची सुमारे 20 हजार कोटींची थकबाकी आहे.  पालिकेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४५०० कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यापैकी आतापर्यंत केवळ २०८७ कोटी रुपये वसूल झाले आहेत.

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता

मालमत्ताधारक – ४ लाख ५० हजार

निवासी – १ लाख २७ हजार

व्यावसायिक – ६७ हजारांपेक्षा अधिक

औद्योगिक – ६ हजार

भूभाग आणि इतर – १२,१५६

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा